loading
home
संस्थापक व मार्गदर्शक

कुलधर्म, कुलाचार, गावरहाटी मार्गदर्शक, नॅचरोपॅथी तज्ञ
संस्थापक व अध्यात्मिक मार्गदर्शक : श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास
संस्थापक - श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यास (रजि), बेतीम बारदेश, गोवा
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष : आर्यावृत्त षट्दर्शन साधू मंडल एवं आचार्य परिषद
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष : मानव रक्षा परिषद
(हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा संचलित)

home
About Shri Swami Samarth Math
home

श्री गावडेकाकांचा मुळ उद्देश कुळधर्म व कुळाचार असल्याने भाविकांना त्यांचा चांगला लाभ होत होता. मुंबईत आता भाविकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे गावडे काकांचे मुंबईत येणे वाढले. त्यात त्यांनी आपला व्यवसाय गावी सुरु केल्याने व्यवसाय व अध्यात्म अशी दुहेरी भूमिका ते समर्थपणे बजावत होते. सन २००९ मध्ये त्यांनी श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास ही संस्था स्थापन केली. मुंबईत व कोकणात खऱ्या अर्थाने हि संस्था कार्यरत झाली. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम सुरु केले. 'श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा' मुंबई व कोकणात त्यांनी सुरु केला व त्यास भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला.

मुंबईतील घाटकोपर येथे येणाऱ्या भाविकांनी संख्या वाढू लागल्यामुळे श्री गावडेकाका यांनी सन २००८ मध्ये दिवा येथे श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना केली. मुंबईतील हा पहिलाच मठ होता जेथे 'श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना' करण्यात आली. आज येथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे.

Read More
What exactly is Spirituality?

भक्तजन हो अध्यात्म म्हणजे नेमके काय ? या प्रश्नाचे उत्तर आपण नेमके सांगू शकणार नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा अध्यात्माकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आपला महाराष्ट्र संत परंपरा म्हणून ओळखला जातो. या भूमीत अनेक संत, महात्मे होऊन गेले. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जनसामान्यावर उमटविला. त्याचीच कास धरुन प्रत्येक माणसाने आपल्याला जो अध्यात्मिक मार्ग आवडेल, भावेल, मनःशांती मिळेल, ही इच्छा मनात ठेवून तो पंथ स्वीकारला. थोडक्यात काय तर आध्यात्मिक मार्ग कोणताही असो. शेवटी त्याचा मार्ग परमेश्वराकडे जातो.

Read More
home
Activity
Blog